२०१००९०१

विहीगावचा धबधबा

हे प्रकाशचित्र आहे विहीगावच्या धबधब्याचे. प्रकाशचित्रकार योगेश२४. हे सृजन आहे निसर्गाचे आणि चित्रकाराचेही. http://www.maayboli.com/node/19314 या दुव्यावरील त्यांच्या मूळ लेखात त्यांच्या तिथल्या भेटीचे सविस्तर वृत्त वाचता येईल. कल्याण-पडघा रोडने, कसारा घाट सुरू होण्याआधी डावीकडे जव्हार फाटा (कसारा-जव्हार) आहे. त्याच रस्त्यावर पुढे साधारण १०-१२किमी अंतरावर वसले आहे "विहिगाव". या धबधब्याची भेट मिलिंद गुणाजी यांच्या "माझी मुलुखगिरी" या पुस्तकातही होऊ शकेल.

ते पुढे लिहितात, "कसारा ते जव्हार हा संपूर्ण प्रवासच स्वप्नवत आहे. मी स्वतः या रस्त्याने तीन-चार वेळा जव्हारला गेलो होतो (पण त्यावेळेस विहिगाव माहित नव्हते). याच रस्त्याने टप्प्याटप्प्याने विहिगाव, शिर्पामाळ (हे एक ऐतिहासिक ठिकाण. शिवाजीमहाराज जेंव्हा सुरत लुटीसाठीसाठी चालले होते तेंव्हा ते विश्रांतीसाठी शिर्पामाळ येथे थांबले होते. तेथे एक छोटेसे स्मारक आहे), सूर्यमाळ, देवबांध, खोडाळा, मोखाडा आणि जव्हार असे आदिवासे पाडे आणि निसर्गाने मुक्त हस्ताने लयलुट केलेली गावे एकामागोमाग एक लागतात. देवबांध येथे दोन नद्यांच्या संगमावर वसलेले सुंदरविनायक गणेशाचे एक नितांत सुंदर मंदिर खास जाऊन पाहण्यासारखे आहे. पुढे ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले जव्हार, विकएण्ड भटकंतीसाठी उत्तम पर्याय आहे."
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: