२०११०१०२

गळा आवळणारी मुळे

ता प्रॉम (Ta Prohm.)  या नावाने ओळखल्या जाणार्‍या, कम्बोडियातील या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. या मंदिरावर इ.स.१४०० ते १८०० मधल्या काळात आजुबाजुला वाढणार्‍या जंगलाच्या आक्रमणामुळे जो विध्वंस झाला तो बर्‍याचशा प्रमाणात तसाच जतन करून ठेवण्यात आलेला आहे. निसर्ग जसा पृथ्वीचे वर्धन करत असतो, तसाच तो त्याच्यावर आक्रमण करून बांधलेल्या सर्व अकृत्रिम वस्तू नष्टही करत असतो. मानवाने बांधलेली मंदिरे ही कितीही भव्य व विशाल असली तरी शेवटी कृत्रिमच म्हणावी लागतात.  त्यांची देखभाल बंद झाल्याबरोबर निसर्गाने ही कृत्रिम मंदिरे कशा पद्धतीने उध्वस्त करण्यास आरंभ केला होता हे येथे छान जपून ठेवण्यात आले आहे. या झाडाने आपली मुळे या वास्तूच्या सर्व बाजूंनी पसरवून अगदी आवळत आणली आहेत.

हॉलीवूडच्या अनेक चित्रपटात ता प्रोम मंदिरातील ही गळा आवळणारी झाडे दाखवलेली आहेत.
श्री.चंद्रशेखर आठवले यांच्या अनुदिनीवर http://chandrashekhara.files.wordpress.com/2010/11/ta-prohm-trees-1.jpg या पत्त्यावर हे चित्र मी प्रथम पाहिले. मग त्यांच्या अनुमतीनेच ते इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: