ऑर्किड बेटावरील बोटीचे जलावतरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऑर्किड बेटावरील बोटीचे जलावतरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१२०३०१

ऑर्किड बेटावरील बोटीचे जलावतरण



तैवान मधील लान-यू ऊर्फ ऑर्किड बेटावरील एका बोटीच्या जलावतरण समारंभाचे हे प्रकाशचित्र, “हंस” यांच्या मिसळपाव डॉट कॉम वरील http://www.misalpav.com/node/20667 “सफर तैवानची-भाग-३-लान्-यू बेट” ह्या लेखातून घेतलेले आहे. इथे पुन्हा प्रकाशित करण्याकरता त्यांनी अनुमती दिली त्याखातर त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद!

बोटीची पूजा करून मिरवणुकीने तिचे जलावतरण करण्यात येते यावेळी बोट सगळेजण उचलून नेतात व मध्ये मध्ये हवेत उंच फेकून झेलतातही.



डावीकडचे चित्र तिथल्याच थोरोको राष्ट्रीय अभयारण्यातील एका संगमरवरी दगडातून कोरलेल्या शिल्पाकृतीचे आहे तर उजवीकडील चित्र निसर्गतः तयार झालेल्या संगमरवरी दगडातील एका व्याघ्रमुखाचे आहे.

भारतातून अनेक लोक विविध कारणांनी विदेशात जातात, वास्तव्य करतात, पर्यटनही करतात. “हंस” हे सुमारे पाच वर्षे,  मूळचा चीन समजला जाणार्‍या तैवानमध्ये उच्च-शिक्षणानिमित्त राहत असत. तेथे पर्यटनही करत. “सफर तैवानची” ह्या शीर्षकाखाली त्यांनी मिसळपाव डॉट कॉम वर एक नितांत सुंदर लेखमालाच लिहिलेली आहे. तैवानमधील पर्यटनस्थळे, जाती-जमाती, रीतीरिवाज, मूलभूत सोयिसुविधा, निसर्ग आणि मनुष्यनिर्मित सृजनशिल्पे यांच्या सुरस चित्र-वर्णनांनी त्यांचे लेख वाचनीय झालेले आहेत. ते जसे मला आवडले आहेत तसेच तुम्हालाही नक्कीच आवडतील.