सुरेख चित्र, खंड्या! स्पष्ट-अस्पष्ट यांतले अंतर पुसून टाकणार्या रूपरेषा, आकृतीच्या सर्व पैलूंबाबतचे उत्तम आकलन आणि ते सर्व पैलू कागदावर हुबेहूब उमटवणारी नेमकी हस्तकला, यांचे मनोहारी मिश्रण.
त्याच्या डोळ्यातले खरेखुरे वाटणारे भाव. सर्वच चित्ताकर्षक. मला आवडले. मला हे चित्र माझ्या या अनुदिनीवर, सृजनाचा सुरेख आविष्कार म्हणून लावावे अशी इच्छा हे! लावू का? असा प्रश्न मी वर्षा पेंडसे-जोशी उपाख्य सायुरी यांना विचारला. त्यांनी अगदी सहजपणे होकार दिला. http://www.maayboli.com/node/25491 या दुव्यावरील "रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली चित्रे" या लेखात त्यांनी ही रेखाटने ठेवलेली आहेत.
त्या व्यक्ती-रेखाटनेही काढतात. व्यवसायाने मुक्तहस्त भाषांतरकार असलेल्या वर्षा यांना सुरेख चित्रकला येते हे एक आश्चर्यच आहे. त्यांना या छंदाच्या विकसनाकरता हार्दिक शुभेच्छा!