श्री.शशांक पुरंदरे यांच्या दारात एके दिवशी सकाळी आलेल्या ह्या पिल्लाने त्यांना कसे रमवले हे त्यांनी स्वतःच मायबोली डॉट कॉम वरच्या http://www.maayboli.com/node/24654 ह्या लेखात सुरेख वर्णन केले आहे. इतर खाद्यपदार्थ खाऊ न शकलेल्या पिल्लाने मध मात्र आवडीने चाखला.
त्याच्या शक्तीने तो उडता झाला. आपल्या मायबापांबरोबर निघूनही गेला. एक दिवसाच्या या पाहुण्याची ती मूळ हकिकत वाचनीयच आहे. त्या सुंदर पिल्लाचा हा फोटो इथे त्यांच्याच अनुमतीने पुन्हा प्रदर्शित केलेला आहे. दारात चालून आलेले सौंदर्य टिपून ठेवण्याची शशांक यांची रसिकता मला आवडली. तुम्हालाही अवश्य आवडेल!
त्यांच्याच सदिच्छेने आज तो पाहुणा आपल्याही घरी पाहुणचारार्थ आलेला आहे!
