आपल्या संस्कृतीत परंपरागत अनुभवाच्या संग्रहाकरता पुरातन कालापासून मौखिक पाठांतरच विश्वासार्ह माध्यम मानले घेले आहे.मात्र काळाच्या ओघात अनेक चित्ररूप पद्धतीही विकसित करण्यात आल्या आहेत. जेव्हा कागद नव्हते अगदी तेव्हापासूनच्या या पद्धती अभिनव आणि टिकाऊ ठरल्या आहेत. हजारो वर्षांपूर्वी भूर्जपत्रांवर लेखन केले जात असे. पोथ्या लिहून संग्रहित केल्या जात असत.
मी १९८४च्या राष्ट्रीय हिमालयी पदभ्रमण कार्यक्रमात सहभागी झालो होतो,त्यावेळी पार्वती आणि व्यास नद्यांच्या खोर्यांतून आमचा प्रवास झाला. समुद्र सपाटीपासून १२,००० फूट उंचीवरल्या खौली खिंडीच्या वाटेवरील रवाटी नावाच्या जागी तंबूत राहत असता,दूर जी झाडे दिसत होती ती भूर्जपत्रांची असल्याचे समजले.मग आम्ही ती जवळून पाहिली.त्यांच्या बुंद्यांवर चाकूने हलकासा उभा चिरा मारला. साल सुटे केले आणि बुंध्यापासून सुटे केले. हेच ते भूर्जपत्र.
या चित्रात भूर्जपत्राची बाहेरील बाजू डावीकडे तर आतील बाजू उजवीकडे दिसत आहे. बाहेरील बाजूवर काळ्या आणि निळ्या बॉलपॉईंट पेनाने १९८४ साली लिहीलेले "॥ श्री ॥" आज २५ वर्षांनंतरही शाबूत आहे. भूर्जपत्रांवर लिहिलेल्या पोथ्या तर हजारो वर्षेही सुरक्षित राहू शकतात.
अलीकडेच मी ओरिसात पर्यटनास गेलेलो असतांना तिथे ताल(ताड) पत्रांवरची चित्रकारी पाहता आली. ताडाची पाने टिकाऊ असतात. त्यावर काढलेली चित्रे हजारो वर्षे टिकतात. ताडपत्रांवर गस्ती ऋषींनी लिहिलेले भविष्य नाडीपट्या म्हणून तामिळनाडूत विख्यात आहेच.
तालपत्रावर सुईने टोचून टोचून चित्ररेखा तयार करायच्या. त्या टोचण्यांवर मग दालच्या पानांचा रस चोपडून काळसर हिरव्या चित्ररेखांची चित्रे बनवणे, म्हणजे तालपत्रांवरची चित्रकारी. "दाल - कमळाच्या जाळ्यांप्रमाणे पाण्याच्या डबक्यांत अनिर्बंध वाढणारी,अळूसारख्या हिरव्यागार पानांची आणि हळदीच्या फुलाच्या आकाराची, फिकट जांभळी फुले असणारी वनस्पती“
वरच्या पट्टीत दाखवल्याप्रमाणे देवादिकांची किंवा खालील पट्टीत दाखवल्याप्रमाणे जनजीवनाची चित्रे या शैलीत रेखाटली जातात. कोणार्क शैलीतील कामचित्रेही या शैलीत रेखाटण्याची प्रथा आहे. या प्रकारे पुस्तक-खुणा, भेटपट्या इत्यादीही बनवल्या जातात, ज्या दहा दहा रुपयांना विकल्या जातात.
या चित्रात आठ इंची लांब आणि जवळपास एक इंची रुंद अकरा पत्रांवर सुरेख मंगल-कलश चितारला आहे. आपल्या कालनिर्णयच्या आकाराचे चित्र ह्यातून निर्माण होते. ते साधारणपणे तीनशे रुपयांना विकतात.
या चित्रात आठ इंची लांब आणि जवळपास एक इंची रुंद दहा पत्रांवर सुरेख शंख चितारला आहे.
तालपत्रे परस्परांस काळ्या दोर्याने शिवलेली असल्याने आणि तळाशी पोथीस असतो तसे लाल कापड लावलेले असल्याने, त्या चित्रांची व्यवस्थित घडी होऊ शकते आणि ती खालीलप्रमाणे दिसते.
देवादिकांची, प्राण्यांची आणि कामजीवनाची कोणार्क शैलीतील चित्रे, दशावतारांच्या स्वरूपातही उपलब्ध असतात.
अशा चित्रांत वर एक देवाचे चित्र. खाली, त्याचे दहा अवतारांची दहा चित्रे, अशी रचना असते.
मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी असे दशावतार वरील तालपत्रावर कोरून ते तालपत्र खालील सलग तालपत्रावर शिवलेले असते. एका खाली एक अशा दोन तालपत्रांच्या पट्ट्यांवर मिळून एक अवतारचित्र पूर्ण होते.
या दशावतारांना, "आवाज" दिवाळी अंकात असतात तशा द्वयर्थी खिडक्यांसारख्या, त्रयर्थी खिडक्या काढून, दहाही अवतार, दहा निरनिराळे प्राणी अथवा दहा कामचित्रे खिडक्या उघडून पाहता येतात. घड्या घालून हे सर्व चित्र एका आठ इंच लांब व सुमारे दोन इंच रुंद पट्टीच्या आकारात गुंडाळून ठेवता येते.चित्राच्या पाठीमागे पोथीला वापरतात तसे लाल कापड लावलेले असल्याने त्याचाच गुंडाळण्या साठी उपयोग होतो. दोन तालपत्रे एकमेकास बिजागरींनी जोडावीत तद्वत काळ्या दोर्यांनी शिवलेली असतात. ती शिवण वर्षानुवर्षे टिकते असा दावाही केला जातो.
सर्वात खालच्या चित्रात खिडक्या कशा शिवलेल्या असतात ते नीट लक्षात येईल.
.
ताडाचे झाड.
तालपत्रांची टोपी.
एवढेच काय पण ओरिसामधे तालपत्रांच्या तट्ट्यांनी झोपड्यांची शाकारणीही केली जाते.
(हे चित्र महाजालावरून साभार.)

चीनमधे तर भूर्जपत्रांपासून सुबक हस्तकलेच्या वस्तुही बनवतात. उदाहरणार्थ वरील पिशवी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा