२०११०५०१

ड्रॅगनधारी बशी



’वर्षू’ ह्या गेली अनेक वर्षे ’क्वांग चौ’ या क्वांग्डाँग प्रांतातील चीनमधल्या गावात वास्तव्य करून आहेत. चीनमध्ये पर्यटक म्हणून फिरत असतांना त्यांनी चीनचा राजवाडा, ’चीनमधील खाऊगल्ली’, ’बिजिंगमधील धारावी’ इत्यादी सचित्र लेख, मायबोली डॉट कॉम वर लिहीले.

त्यातील माहितीच्या मौलिकतेने आणि सुरेख चौकटींतील सुयोग्य प्रकाशचित्रांच्या पखरणीमुळे, अर्वाचीन चीनच्या चक्षुर्वैसत्यं दर्शनाची जणू ते लेख म्हणजे एक खिडकीच ठरले आहेत. ते लेख मुळातच वाचावेत असे आहेत. त्यात टाकलेल्या चीनीमातीच्या ड्रॅगनधारी बशीचे एक प्रकाशचित्र मला चीनी कुंभारकलेचे एक प्रातिनिधिक सृजनचित्र भासले. त्यांनीही ते उदार मनाने मला इथे लावण्यासाठी दिले. म्हणून दुर्मिळ चीनी कुंभारकलेचा हा उत्कृष्ट नमूना इथे विराजमान आहे. त्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

चीनच्या नवनव्या भागात मुक्त संचार करून, त्यांनी अशीच आपल्या चीनविषयीच्या माहितीत सचित्र भर घालावी. त्याकरता माझ्या हार्दिक शुभेच्छा!

त्यांचे मायबोली डॉट कॉमवरील इतर काही गाजलेले लेखन खालील दुव्यांवर सापडू शकेल.

http://www.maayboli.com/node/25180काळ्या इतिहासाचा साक्षीदार- समर पॅलेस-बीजिंग
http://www.maayboli.com/node/24901 बीजिंग आणी आसपास
http://www.maayboli.com/node/25042 टेंपल ऑफ हेवन
http://www.maayboli.com/node/24921 फेक ग्रेट वॉल
http://www.maayboli.com/node/24765 बीजिंग ची खाऊ गल्ली
http://www.maayboli.com/node/23826 कथा चायनीज नववर्षाची-१
http://www.maayboli.com/node/23855 कथा चीन च्या नवर्षाची-२ (राशीचक्र)

याव्यतिरिक्त त्या लोकसत्तामध्येही लिहीत असतात. त्यांच्या एका लेखाचा दुवा

http://www.loksatta.com/daily/20090221/ch16.htm हा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: