२०१००८०७

वडा, वृक्षराजा

८ मे २००७ रोजी आम्ही नागपूर जवळील पेंच प्रकल्पास भेट दिली होती. तिथे महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाने पर्यटकांच्या सोयीकरता मोठमोठ्या वटवृक्षांच्या पारंब्यांच्या आधाराने मचाणे, विहारकुंजे बांधून वनविहाराची सोय केलेली आहे. त्यातलाच हा एक वटवृक्ष.

वडा, वृक्षराजा

तुझ्या दर्शनाने, मी झालो पिसा
तुला वृक्षराजा, मी विसरू कसा

कधी थोर व्यक्तीस, भेटू जरी
पुरी याद ठेवू, न विसरू कधी

तुझ्या साहचर्याची, ती माधुरी
कशी सांग, विसरू स्मरणातुनी

ती उत्तुंग उंची, न दृष्टीत भरे
तो घेर सामावी, मचाणे जिने

पारंबी शाखेवरी, लोंबते अन्
शाखाही पारंबी, धरूनी बसे

कसा स्वैर झुललो, कसा खेळलो
चढलो जिने, फांदीवर बैसलो

मचाणावरी, न्याहरी केली अन्
तुझ्या साहचर्यानी आनंदलो

नरेंद्र गोळे २००७०५०८