http://www.maayboli.com/node/22764 या दुव्यावर "कांदापोहे" यांनी भिगवण येथे केलेल्या पक्षी-निरीक्षण सहलीचे सुरस वर्णन पाहायला मिळू शकेल. त्यातीलच या "वंचक" पक्षाचे हे प्रकाशचित्र, त्यांच्या अनुमतीने, इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. अनुमतीखातर त्यांना अनेक धन्यवाद!
वंचना म्हणजे फसवणूक. स्वतःचा सुगावा भक्ष्यास लागू न देता त्याची शिकार सहज करता यावी , अशा बेतानेच त्याचे सृजन ईश्वराने केलेले आहे. ’जसा देश तसा वेष’ या उक्तीनुसार ईश्वर प्रत्येक सजीवाकरता त्याला साजेसा परिवेष त्याला देत असतो. पाणथळ जागांत मासे व अन्य सजीवांची शिकार करून जगणार्या ’वंचका’स भक्ष्याची व्यवस्थित फसवणून करता यावी म्हणून त्याला मिळालेला हा वेष पाहा. पाणथळ जागांच्या परिसरात कुठेही सहज लपून जाईल असा तो परिवेष आहे. इथे केवळ कुठल्याशा फळकुटावर सुटा सापडल्याने नजरेत भरतो आहे. एरव्ही परिसरात मिसळून जाणे हाच या परिवेषाचा विशेष, त्याला उपजीविकेसाठी उपयुक्त ठरत असतो!
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा