२०११०३३०

गुहेतील महादेव


कुठलाही मराठी दुर्गभ्रमण करणारा, कधी ना कधी तरी, हरिश्चंद्रगडावर गेलेलाच असतो. तिथे एक कलापूर्ण दगडी बांधकामाचे महादेवाचे मंदिर आहे. शिवाय एका गुहेतही महादेवाची पुरूषभर उंचीची पिंड दगडात खोदून काढलेली आहे. खरे तर हे त्या गुहेत खोदून तयार केलेले संपूर्ण मंदिरच आहे. एक वगळता, मंदिराचे अन्य खांब भंगलेल्या अवस्थेत आहेत. तरीही त्यावरील मुळातील सुबक नक्षी आणि आकार पुरेसे स्पष्ट आहेत. इथे बहुधा अंधारच असतो. मात्र डॉ.अरुण साठे यांनी फ्लॅश फोटोग्राफीद्वारे ते सर्वच मंदिर उजळून टाकलेले वरील चित्रात दिसून येते. स्वतः डॉ.साठे यांनीच हे चित्र त्यांच्या संग्रहातून दिलेले आहे. गुहेत कायमच पाणी साठलेले असते. बारकाईने पाहिल्यास पाण्यातील प्रतिबिंबही पाहता येईल. डॉक्टर साठे भारतात तर सर्वदूर खूप फिरलेले आहेतच, शिवाय भारतातर्फे अंटार्टिका खंडात "दक्षिण गंगोत्री"स गेलेल्या संशोधन पथकाचेही ते सदस्य राहिलेले आहेत.

1 टिप्पणी:

mannab म्हणाले...

आपला आजचा हा सृजनशोध अत्यंत लक्षवेधी आहे. धन्यवाद.डॉ.साठे यांच्या संग्रहातील विशेषतः अंटार्टिका प्रवासातील छायाचित्रे पाहण्यास मी उत्सुक आहे.
मंगेश नाबर.