२०११०४१२

वनस्पतींचा पूल, मावल्यनॉन्ग, मेघालय























वनस्पतींचा पूल, मावल्यनॉन्ग, मेघालय, हे प्रकाशचित्र श्री.गणेश बेहेरे ह्यांनी मायबोली डॉट कॉम या संकेतस्थळावरील http://www.maayboli.com/node/25003 ह्या "लाईव्ह ब्रिज" या आपल्या नोंदीत दिलेले आहे. इथे त्यांच्याच अनुमतीने पुन्हा प्रदर्शित करत आहे.

ते म्हणतात, "हा पूल आपोआप तयार झाला आहे असं स्थानिक लोकं सागंतात. काही काळापूर्वी तिथे लहान नाला होता, नाला कालांतराने मोठा होत गेला आणि त्या झाडांखालील माती व दगड वाहून गेलेत. दोन गावं या पूलांनी जोडली गेलेली आहेत. पूलाची रुंदी साधारण २ ते ३ फूट आहे आणि मस्त माती वगैरे टाकून तयार केला आहे. ३०-४० लोकं एका वेळेस सहज येऊ-जाऊ शकतात."
 
"भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बारापणी, मेघालय इथे मी ठरवून नोकरीसाठी आलो. संशोधनाला इथे खूप वाव आहे. भरपूर काही करण्यासारख आहे. इकडे पाहण्यासारखे (निसर्ग) पण खूप काही आहे, जसा वेळ मिळेल तसे पाहणे होईल आणि त्यातील अनमोल रत्नांचे फोटो मायबोलीवर नक्केच टाकेन."

आपण आता मायबोलीवर त्यांच्या सुंदर प्रकाशचित्रांची प्रतीक्षा करूच! तोपर्यंत ह्या नैसर्गिक पुलाच्या नयनरम्यतेचा आस्वाद घेऊ. सुंदर चौकट निवडून काढलेल्या सुरेख प्रकाशचित्राबद्दल श्री.बेहेरे यांचे कौतुक करू!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: