गुलाबी-जांभळ्या, जणू ’माचीस’च्या काड्या ।
सरात माळल्या, चक्राकार, हारीने सार्या ॥
फुलले, उमलले जणू कळीचे फूल हे ऐसे ।
पाकळ्यांवर चढवले, कौतुके ’गूल’ हे तैसे ॥
’माचीस’च्या काड्याच वाटाव्यात अशा गुलाबी सुरळीच्या पाकळ्यांवर, जांभळे ’गुल’ लावावे आणि तयार झालेल्या रचनेचेच लिलीचे फूल व्हावे, अशा कल्पनारम्य फुलाचा हा प्रत्यक्षातील फोटो प्रस्तुत केला आहे ’मी अमित’ ह्यांनी. http://www.maayboli.com/node/25878 या दुव्यावरल्या “सुर्यास्त आणि सुमने!!!!” या लेखात त्यांनी हा फोटो दिलेला आहे. इथे त्यांच्याच अनुमतीने पुन्हा प्रकाशित करत आहे. मला तर बेहद्द आवडला आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल.
अनुमतीखातर ’मी अमित’ ह्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा