२०११०६२८

चहाचे मळे-मुन्नार

हे छान चहाचे मळे किती । रेखले चित्र टेकडीवरती ॥
हे हिरवे कौतुक बघू किती । "चंदन" चित्रित करतो शेती ॥

मायबोली डॉट कॉमवरील “मार्को पोलो” म्हणजेच चंदन मोगरे, हे भारतभर सुजाण पर्यटन करणारे एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आहे. तिथे त्यांनी लिहिलेली “अतुल्य भारत!” लेखमाला कायम गाजते आहे. तिचे वैशिष्ट्य आहे चित्ररूपानी भारत साकार करणारी वास्तवदर्शी प्रकाशचित्रे. चहाच्या मळ्यांचे हे प्रकाशचित्र त्यांच्या “अतुल्य! भारत - भाग १६: केरळ” या लेखातून, त्यांचे अनुमतीनेच घेतले आहे.

टेकड्यांच्या उतारांवर विस्तीर्ण भूभागात पसरलेले हिरवे हिरवे चहाचे मळे हे नेहमीच चित्तवेधक दृश्य असते. मग ते सिक्किम असो की मुन्नार. दीड-दीडशे वर्षांचे आयुष्य असू शकणारी चहाच्या झुडुपांची दाटी मन प्रसन्न करते. सुयोग्य चौकट निवडून त्या मळ्याचा ताजेपणा कैद करणारे, मुन्नार येथील वरील सुरेख प्रकाशचित्र, इथे प्रकाशित करू दिल्याखातर चंदन यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

आमच्या सिक्किम भेटीतही अशीच सुंदर चहाच्या लागवडीची टेकडी आम्ही पाहिली होती. तीही तुम्हाला http://nvgole.blogspot.com/2010/04/blog-post_6520.html#links या दुव्यावर पाहता येईल.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: