२०१११०१२

अमेरिकन खार

श्री.अशोक कर्नाड, बोरिवली यांनी २६ मे २००८ रोजी अमेरिकेतील योस्समिट्टे, इथे एका फूड मॉलजवळ टिपलेली ही अमेरिकन खार आहे. हे प्रकाशचित्र इथे त्यांच्याच संमतीने देत आहे.

२२ वर्षांच्या सरकारी सेवेनंतर अवकाशप्राप्त केल्यावर, खासगी कंपनीचे सल्लागार म्हणून श्री.कर्नाड ३० देशांतून फिरले आहेत. ते उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांनी टिपलेली ही अमेरिकन खार आपल्याकडच्या खारीपेक्षा अगदीच निराळी आहे! नाही का!! तुम्ही काय म्हणता?


४ टिप्पण्या:

श्री रा म म्हणाले...

ह्या खारीच्या पाठीवर भारतीय खारींसारखे झेब्रा क्रॉसिंग नाही...

नरेंद्र गोळे म्हणाले...

हो. खरंय! ती रामाची पाच बोटे.... ती नाही आहेत.

अनामित म्हणाले...

च्यामारी अमेरिकेतपण खार आहे. आम्हाला वाटलं फक्त मुंबईतच आहे. अमेरिकेत घाटकोपर पण असते का?

mannab म्हणाले...

मी सध्या अमेरिकेत राहत आहे.येथे मी दोन प्रकारच्या खारी पाहातो.एक आपण दाखवलेली बिन पट्ट्यांची खार.ही आकाराने चांगलीच जाडजूड पण हालचाली पाहिल्या तर अत्यंत चपळ आणि डौलदार असते. विशेषतः तिची मोठी व झुपकेदार लांबलचक शेपटी. त्या उलट दुसरी खार दिसते. तिच्या पाठीवर पट्टे असतात. ती मात्र आकाराने खूप लहान असते. तेव्हा फक्त भारतात पट्टे असलेली खार असते, असे नाहीये. राम येथेही असतो बरं का.

मंगेश नाबर.