
माहिती तंत्रज्ञानाच्या व्यवसायातून बाहेर पडून सृष्टीसौंदर्य बघावेसे वाटणे चांगले खरेच. तसे वाटले आणि सुरेख चित्रचौकटींची निवड पक्की झाली. मदनबाण ह्या मिसळपाव डॉट कॉम वरील हौशी प्रकाशचित्रकाराने, निकॉन पी-१०० कॅमेर्याने, सुरेख चित्रचौकटी निवडून सुंदर फुलपाखरे चित्रबद्ध केलेली आहेत! http://misalpav.com/node/19592 ह्या दुव्यावर ती पाहता येतील.
वरील फुलपाखराचे प्रकाशचित्र हे त्यांच्या चौकट निवडीचे आणि कुशल चित्रण कौशल्याचे फलित आहे. सुस्पष्ट रूपरेषा आणि चमकदार रंगसंगती ह्या सृजनकर्त्याच्या देणगीने ते फुलपाखरू संपन्न झालेले आहे. तेवढ्याच प्रखरतेने ते सौंदर्य आपल्यापर्यंत पोहोचवले आहे मदनबाण ह्यांनी. त्याखातर त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! त्यांच्याच अनुमतीने ते इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा