२०११११०६

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये मला वाटतो!


नश्वर माध्यमात शाश्वत चित्रे रेखाटणारे लोक मला नेहमीच थोर वाटत आलेले आहेत. त्यांच्या कलेचे हवे तेवढे कौतुक होतांना दिसत नाही.

मिसळपाव डॉट कॉम वर ’पूनम ब’ नावाने लिहिणार्‍या व्यक्तीने एवढ्या सुबक आणि रेखीव रांगोळीचे प्रकाशचित्र तिथे पेश केले की मला:

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये मला वाटतो |
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात चित्रांत तो ||
स्वर्भूसंग तयांत इतुक्या अल्पावकाशी नसे |
कोणी दाखविला अजून सुभगे जो साधिला तू असे ||

ह्या केशवसुतांच्या रांगोळीवरील कवितेचीच आठवण झाली.

त्याच सुबक रांगोळीचे हे प्रकाशचित्र, त्यांच्याच अनुमतीने इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. त्यांच्या उत्तम कलेस नवनवोन्मेषशाली शाखा-पल्लवांची बहार येवो, हीच सदिच्छा!

http://www.misalpav.com/node/19612 या दुव्यावर ती रांगोळी मिसळपाववर पाहायला मिळेल.
त्यांनी कलादालन ह्या अनुदिनीवर पूनम बोरकर नावाने त्यांच्या इतरही अनेक कलाकृती प्रदर्शनार्थ मांडलेल्या आहेत. त्याही सुरेख आणि प्रेक्षणीय आहेत. तसेच, त्यांच्या पाककृतीही आपल्याला त्यांच्या कांदेपोहे ह्या अनुदिनीवर पाहायला मिळतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: