

"गंध गावाकडला" ह्या मायबोली डॉट कॉम वरील एका लेखात श्री.किरण सामंत ह्यांनी कोकण-सहलीचे सचित्र वर्णन केलेले आहे. कोकण म्हटले की लाल मातीचे रस्ते नक्कीच आठवतात. त्यांच्या लेखात आढळेली लाल मातीच्या रस्त्यांची प्रकाशचित्रे मला खरोखरीच वास्तव आणि प्रातिनिधिक वाटली. त्यांनी ती इथे पुन्हा प्रकाशित करण्याकरता अनुमतीही दिली. ती जशी मला आवडली आहेत तशीच तुम्हालाही नक्कीच आवडतील. मुळातला लेखही वाचनीय आहे. तोही अवश्य वाचावा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा