२०१००७०६

अश्वत्थ

वड, पिंपळ आणि औदुंबर या तीन्ही वृक्षांना अश्वत्थ वृक्ष म्हणतात. गीतेत श्रीकृष्णाने आपण स्वतःच "अश्वत्थः सर्व वृक्षाणां" असल्याची ग्वाही दिली आहे. तेव्हा अश्वत्थाचे वर्धन अद्वितीयच असावे यात नवल ते काय?

तिकोना किल्ल्याच्या तटावर आढळलेला हा वृक्ष प्रकाशचित्रांकित केलेला आहे "आऊटडोअर्स" यांनी.
"योगेश२४" यांनी तिकोना किल्यावर लिहीलेल्या मायबोली डॉट कॉम वरील
http://www.maayboli.com/node/15114
या धाग्यावर प्रतिसाद देतांना त्यांनी हा फोटो तिथे दिलेला आहे.



चित्रकविताः अश्वत्थ

दुर्दम्य आस जगण्याची, वेग वाढीचा ।
तेजाची धरली ओढ, ध्यास पाण्याचा ॥१॥

सांध्यांत चिर्‍यांच्या, शोधत गेलो पाणी ।
पत्थरांस धरुनी घट्ट, चढत अनवाणी ॥२॥

जे धुंडित फिरलो, आकाशातील तेजा ।
ते स्वरूप माझे, भूषण आज तटा या ॥३॥

नरेंद्र गोळे २०१००७०९

.

२ टिप्पण्या:

Meenal Gadre. म्हणाले...

क्लासिक फोटो आहे. निसर्ग खरोखरच अजब आहे!

mannab म्हणाले...

वा वा. अप्रतिम छायाचित्र आणि तितकीच आपली कविता. शब्दाशब्दातून आपण चित्रातील आशय मोकळा करून समोर ठेवला आहे. धन्यवाद.
मंगेश