तिकोना किल्ल्याच्या तटावर आढळलेला हा वृक्ष प्रकाशचित्रांकित केलेला आहे "आऊटडोअर्स" यांनी.
"योगेश२४" यांनी तिकोना किल्यावर लिहीलेल्या मायबोली डॉट कॉम वरील
http://www.maayboli.com/node/15114
या धाग्यावर प्रतिसाद देतांना त्यांनी हा फोटो तिथे दिलेला आहे.

चित्रकविताः अश्वत्थ
दुर्दम्य आस जगण्याची, वेग वाढीचा ।
तेजाची धरली ओढ, ध्यास पाण्याचा ॥१॥
सांध्यांत चिर्यांच्या, शोधत गेलो पाणी ।
पत्थरांस धरुनी घट्ट, चढत अनवाणी ॥२॥
जे धुंडित फिरलो, आकाशातील तेजा ।
ते स्वरूप माझे, भूषण आज तटा या ॥३॥
नरेंद्र गोळे २०१००७०९
.
२ टिप्पण्या:
क्लासिक फोटो आहे. निसर्ग खरोखरच अजब आहे!
वा वा. अप्रतिम छायाचित्र आणि तितकीच आपली कविता. शब्दाशब्दातून आपण चित्रातील आशय मोकळा करून समोर ठेवला आहे. धन्यवाद.
मंगेश
टिप्पणी पोस्ट करा