गोदावरीच्या किनार्यावरील एकनाथांचे मंदिर हा,
महाराष्ट्रातील लाकडी वास्तुकलेचा एक जुना आणि उत्कृष्ट नमुना आहे!
१९-०९-२००७ रोजीच्या आमच्या पैठणभेटीदरम्यान काढलेले हे प्रकाशचित्र आहे.
एकनाथांच्या भारुडांचे गारूड, त्यांच्या स्पृश्यास्पृश्यतेच्या पलीकडच्या धर्मभावना आणि वस्तुनिष्ठ शिकवणीची छाप, पैठणच काय पण सार्याच महाराष्ट्रावर आजवर पडलेली आहे. भव्य, चौसोपी तटबंदीत, प्रासादिक नाथमंदिर विराजमान आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पाठीमागच्या तटातून बाहेर पडल्यावर गोदावरीच्या घाटाचे चित्र समोर साकारते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा