२०११०७१८

साकव






निगडे गावातून गोप्या घाटाकडे जातांना लागणारा नदीवरील हा साकव चित्रित केला आहे अमोल नाईक यांनी, "गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!" या त्यांच्या मिसळपाव डॉट कॉम वरील लेखात त्यांनी यासंबंधी माहिती दिलेली आहे. त्यांचा मुळातील पदभ्रमणावरील लेख खरोखरीच वाचनीय आहे. त्याचा दुवा पुढे दिलेला आहे. http://www.misalpav.com/node/18488

सुरेख प्रकाशचित्रे आणि बहारीचे वर्णन यांनी तो लेख सजलेला आहे. त्यांची भटकंतीही मनसोक्त आनंदाची झालेली असणार. त्यातील साकव मला विशेष आवडला! पर्यावरणस्नेही आणि सुंदर! चालतांना कदाचित थरारकही वाटत असेल! पण एकूण अनुभव एकदा तरी घेऊनच पाहावा असा वाटतोय. छान. तो इथेही असावा असे वाटून मी त्यांना अनुमती मागितली. आणि त्यांनी ती दिली!

ते म्हणतात, "मग मी त्याला साकवाबद्दल विचारलं. तसा तो म्हणाला सरकारी कामं आमच्या पतूर पोहोचीत न्हाईत म्हणून समद्या ग्रामस्थांनी मिळून नदीवर साकव घातला आहे. तो साकव पाहिल्यावर मी थक्क झालो."

कोकणातल्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे साकव. सामान्यतः साकव कोकणातच आढळून येत असले तरीही, हा साकव मात्र घाटावरला आहे. शिवाय, तो अमोल यांनी इतक्या सुंदरतेने चौकटीत बद्ध केला आहे की त्याचे वर्णनार्थ आणखी शब्द वेचावेच लागू नयेत. त्याची ही प्रकाशचित्रे मला बेहद्द आवडली आहेत. तुम्हालाही नक्कीच आवडतील!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: