२०१११२२२

लोहगडाची वाट



.

जबरदस्त कडेकोटांनी सुरक्षित केलेली ही लोहगडाची वाट आहे. जितकी चिरेबंद आणि बेलाग, तितकीच कलापूर्ण आणि व्यूव्हरचनात्मक. शिवाजी महाराजांच्या अनेक गडांवर अशी तटाबुरूजांची, चिलखती बुरूजांची व्यवस्था पाहायला मिळते. मात्र ज्याचे रक्षण करावे असे आलिशान राज-महाल कुठेही दिसत नाहीत. रयतेहून राजा फारसा निराळा राहू नये म्हणून महाराजांनी कदाचित आपले राहणीमानच संयमित राखले असावे किंवा आक्रमकांनी टिपून सारे राजमहाल चूर चूर करून टाकले असावेत. मात्र, शूर मावळ्यांच्या विरोधात तसे होण्याची शक्यता फारशी दिसत नाही.
.
हे प्रकाशचित्र श्री.सागर बोरकर ऊर्फ "वल्ली" यांच्या मिसळपाव डॉट कॉम वरील पुन्हा एकदा लोहगड या लेखात पाहायला मिळते. इथे ते त्यांच्याच संमतीने चढवले आहे. http://borkarsagar.blogspot.com या त्यांच्या अनुदिनीवरही त्यांचे लेख आपण वाचू शकाल. उत्तमरीत्या चौकटबद्ध केलेली प्रकाशचित्रे आणि अनुभवसिद्ध वर्णन ह्यांनी त्यांची भटकंती समृद्ध झालेली आहे. मला आवडली तशी तुम्हालाही नक्कीच आवडेल.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: