२०१२०२०३

सुरवंट


http://www.maayboli.com/node/32261 निसर्गाचे टिपलेले काही रंगीबेरंगी क्षण !!!!! ह्या श्री. भालचंद्र यांच्या लेखातील निसर्गदर्शन आणि प्रकाशचित्रांच्या ताजेपणाने मी भारावलो. मला तुमचे एखादे प्रकाशचित्र, उदाहरणार्थ पहिले, माझ्या http://srujanashodha.blogspot.in/ 'सृजनशोध' ह्या अनुदिनीवर लावण्याची इच्छा आहे. अनुमती द्याल का? असे विचारले. त्यांनीही मुक्त मनाने अनुमती दिली म्हणून हे चित्र इथे आहे. तो मूळ लेखही वाचनीय म्हणण्यापेक्षा प्रेक्षणीयच झालेला आहे. अवश्य पाहा! आपण त्यांना सृष्टीच्या सजीव रहस्यांचा असाच वेध घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊ या!

ह्या चित्रात ज्या पानाला खाऊन सुरवंट घडला आहे, त्याच्याच रंगात तो पूर्णपणे तल्लीन झालेला दिसत आहे. सृष्टीचे कौतुक असे की सुरवंट वेगळा आणि पान वेगळे असे लगेचच लक्षातसुद्धा येत नाही. तो पानाचाच एक भाग वाटतो. त्या सुरवंट आणि पान या जोडीचे, रेषा अन्‌ रेषा स्पष्ट करणारे चित्र भालचंद्रजींनी अतिशय सुरेख चौकटबद्ध केलेले आहे. मला हे प्रकाशचित्र बेहद्द आवडले आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल.

1 टिप्पणी:

mannab म्हणाले...

आपल्या 'सृजनशोध' या अनुदिनीवरील सुरवंट पाहून श्री भालचंद्र यांचा प्रकाश चित्रमय लेख वाचला व पाहिला.त्यांनी किती बारकाईने ते ते क्षण टिपले आहेत,याचा आस्वाद घेता घेता मला माझ्या अलीकडील बॉस्टन, अमेरिकतील अल्प काळाच्या वास्तव्यातील काही क्षण आठवले. मी तेथे पानगळीच्या (फॉल सीजन) हंगामात होतो. पानांचे रंग कसे बदलत जातात आणि त्याची उधळण कशी सर्वत्र होत असते, याचे मनोहारी दर्शन पाहून मी वेडा होण्याचे बाकी होते. किती प्रकारची पाने मी जमवत होतो. माझे नातूही मला काही पाने आणून देत होते. एका पानावर तर हिरवा तो पिवळा ते लाल अशा बदलत्या रंगांच्या छटा पाहून मी हरखून गेलो. हा फॉल सीजन मात्र संपता संपता झाडे निष्पर्ण होत असतात.आणि मग उरतात फक्त फांद्या. मग आपण वाट पाहात बसतो, ती वसंत ऋतूची.
आपल्याला व श्री. भालचंद्र यांना माझे धन्यवाद. त्यांचा इमेल पत्ता मिळेल का ?
मंगेश नाबर.