http://www.maayboli.com/node/32451 कंबोडियातील बाजार आणि गावकुस!
ह्या मायबोली डॉट कॉम वरील लेखात ’बी’ ह्यांनी कंबोडियातील त्यांच्या प्रवासाचे सुरस वर्णन केलेले आहे.
त्यातील ताडगूळ तयार करून ताडपत्राच्या डबीत घालून विकणार्या विक्रेत्याचे प्रकाशचित्र मला सृजनाचे द्योतक वाटले.
ते प्रकाशचित्र इथे लावण्याकरता मी त्यांची अनुमती मागितली आणि त्यांनी ती दिलीही.
नारळाचे झाड जसे सर्वांगांनी उपयुक्त आहे तसेच ताडाचेही. ताडाच्याच पानांच्या डब्या (द्रोण) करून त्यातून ताडगूळ भरून विकणे हे खूपच कष्टाचे आणि सृजनात्मक काम आहे. मात्र ही समग्र प्रक्रिया प्रकाशचित्रांत व्यवस्थित नोंदवून ठेवण्याचे श्रेय मात्र ’बी’ ह्यांचेच आहे. त्याखातर त्यांना हार्दिक धन्यवाद. त्यांच्या मूळ लेखात इतरही अनेक सुंदर प्रकाशचित्रे आणि वर्णने आहेत. मला तर ती चांगल्या प्रवासवर्णनाचा वस्तुपाठच वाटली. तुम्हालाही नक्कीच आवडतील. तेव्हा तीही अवश्य पाहावित.
अमिताभ बच्चन आणि नूतन यांनी भूमिका केलेल्या ’सौदागर’ नावाच्या एका जुन्या चित्रपटातही ताडगूळ बनवण्याची ही प्रक्रिया साद्यंत नोंदवलेली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा