अॅलेप्पी (Venice of East) : केरळा बॅकवॉटर्स ह्या मायबोली डॉट कॉम वरील नितांतसुंदर लेखात श्री.योगेश कानडे ह्यांनी दिलेल्या उत्तमोत्तम प्रकाशचित्रांपैकी हे एक प्रकाशचित्र इथे त्यांच्याच संमतीने पुन्हा प्रकाशित करत आहे.
आपल्याकडेही अशा नावा दिसतात. मात्र इतकी नीटनेटकी ठेवलेली आणि सुरेख चित्रित केलेली ह्यासम हीच.
तिथे अलेप्पीतही, हाऊसबोटींना मासे पुरवणारी ही टोपलीची नाव मराठी दंपत्यच वल्हवत होते. त्या नावेची निर्मिती, वापर आणि हे प्रकाशचित्र ह्या सर्वच गोष्टी उत्तम मानवी सृजनाचे नमुने आहेत. त्यामुळे हे प्रकाशचित्र मला जसे भावले, तसे तुम्हालाही नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो. ते इथे पुन्हा प्रकाशित करू देण्यास अनुमती देण्याखातर श्री योगेश यांना मनःपूर्वक धन्यवाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा