मिसळपाव डॉट कॉम वरील “प्रबळ सौंदर्य” ह्या श्री.सौरभ उपासनी ह्यांच्या लेखातील ही प्रकाशचित्रे, इथे त्यांच्याच अनुमतीने पुन्हा प्रकाशित करत आहे. असे, संवेदना-ग्राहकांपासून तर थेट शेपटापर्यंत, नखशिखांत सर्व अवयवांचे यथास्थित दर्शन करवणारे, गोगलगायीचे प्रकाशचित्र तर मी आजवर पाहिलेलेच नव्हते.
वर अंबारीच्या शंखाचेही सम्यक दर्शन घडवलेले आहे. नागपूरला सीताबर्डीवर पूर्वी एक मूनलाईट फोटोस्टुडिओ असे. त्याचे ब्रीदवाक्य समोरच लिहिलेले असे. “इफ यू आर ब्युटिफूल वुई विल कॅच युअर ब्युटी, इफ यू आर नॉट, वुई विल मेक यू!” गोगल गायीलाही सौंदर्य देणारे हे फोटो आहेत. जसे मला आवडले, तसेच तुम्हालाही आवडतील असा विश्वास वाटतो. इथे प्रकाशनार्थ अनुमती दिली म्हणून सौरभ यांस हार्दिक धन्यवाद. तसेच अशाच उत्तमोत्तम प्रकाशचित्रणांकरता त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रबळ सौंदर्य हा लेख मला आवडला. त्यातील प्रकाशचित्रे तर बेहद्द आवडली. त्यांच्या संबंधात ते म्हणतात “खरतर फोटोग्राफीची आवड जपताना ट्रेकिंगची आवड कधी लागली ते कळलच नाही!” म्हणजे मुळात ते कलाकारच आहेत. सृष्टीकडे पाहण्याची त्यांना उपजत दृष्टी आहे. त्यामुळेच त्यांची प्रकाशचित्रे एकाहून एक सरस आहेत.
प्रबळगडावरून कलावंतीणीच्या बुरूजाचे त्यांनी काढलेले फोटोही त्यामुळेच अत्यंत प्रदर्शनीय असणार ह्यात शंका नाही. तेही आम्हाला पाहायला मिळोत ही प्रार्थना!
२ टिप्पण्या:
धन्यवाद, मी काढलेल्या चयाचित्रंचे इथे प्रकाशन केल्याबद्दल...
सहज म्हणून काढलेले फोटो खरच चांगले आले हे तुमच्या या वर्णनावरून जाणवले.
खरच खुप धन्यवाद...
अप्रतिम प्रकाशचित्रे आणि त्याबरोबर आपण लिहिलेली माहिती.
मंगेश नाबर.
टिप्पणी पोस्ट करा